टेनेसी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

टेनेसी

टेनेसी (इंग्लिश: Tennessee; टॅनसी ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या आग्नेय भागात वसलेले टेनेसी क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३६वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १७व्या क्रमांकाचे राज्य आहे.

टेनेसीच्या दक्षिणेला अलाबामा व मिसिसिपी, पश्चिमेला आर्कान्सा व मिसूरी, उत्तरेला केंटकी, ईशान्येला व्हर्जिनिया, पूर्वेला नॉर्थ कॅरोलायना व आग्नेयेला जॉर्जिया ही राज्ये आहेत. नॅशव्हिल ही टेनेसीची राजधानी तर मेम्फिस हे सर्वात मोठे शहर आहे. टेनेसीची पश्चिम सीमा मिसिसिपी नदीने आखली गेली आहे तर राज्याचा पूर्व भागात डोंगराळ आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →