बॅटन रूज (इंग्लिश: Baton Rouge; फ्रेंच: Bâton-Rouge) ही अमेरिका देशातील लुईझियाना राज्याची राजधानी व दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (न्यू ऑर्लिन्सखालोखाल) आहे. हे शहर लुईझियानाच्या आग्नेय भागात मिसिसिपी नदीच्या किनाऱ्यावर वसले असून ते न्यू ऑर्लिन्सच्या ८४ मैल वायव्येस स्थित आहे.
बॅटन रूज हे दक्षिण अमेरिकेमधील एक महत्त्वाचे औद्योगिक व शैक्षणिक केंद्र आहे. येथील बंदर अमेरिकेमधील सातव्या क्रमांकाचे मोठे आहे.
बॅटन रूज (लुईझियाना)
थोडक्यात पण महत्त्वाचे.