लास व्हेगास हे अमेरिका देशाच्या नेव्हाडा राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर नेव्हाडाच्या दक्षिण भागात लॉस एंजेल्स शहराच्या ईशान्येला २६५ मैल अंतरावर स्थित आहे. २०१० साली ५.८४ लाख शहरी व १९.५१ लाख महानगरी लोकसंख्या असलेले लास व्हेगास अमेरिकेमधील ३०वे मोठे शहर व महानगर क्षेत्र आहे.
येथील असंख्य कॅसिनो, जुगार अड्डे तसेच इतर मनोरंजन सोयींसाठी लास व्हेगास जगभर प्रसिद्ध आहे. लास व्हेगासला जगाची विरंगुळा राजधानी ह्या टोपणनावाने ओळखले जाते. येथील ४.२ मैल लांबीच्या लास व्हेगास बुलेव्हार्ड (द स्ट्रिप) ह्या रस्त्यावर जगातील काही सर्वात मोठी हॉटेल्स व कॅसिनो (जुगारखाने) आहेत.
लास व्हेगस
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.