न्यू यॉर्क सिटी सबवे (इंग्लिश: New York City Subway) ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क महानगरामधील उपनगरी जलद वाहतूक रेल्वे सेवा आहे. एकूण २०९ मैल लांबीच्या २४ मार्गांवर धावणारी व २६८ स्थानकांना सेवा पुरवणारी न्यू यॉर्क सिटी सबवे ही जगातील सर्वात जुन्या व विस्तृत जलद वाहतूक प्रणालींपैकी एक आहे. ही सेवा अमेरिकेमधील सर्वात वर्दळीची तर जगातील तोक्यो, मॉस्को व सोल खालोखाल चौथ्या क्रमांकाची वर्दळीची आहे. दररोज सुमारे ४३,९५,०६३ प्रवासी ह्या रेल्वेने प्रवास करतात.
न्यू यॉर्क सिटी सबवे २७ ऑक्टोबर, इ.स. १९०४ रोजी सुरू झाली. ही रेल्वे न्यू यॉर्क शहराच्या पाचपैकी मॅनहॅटन, ब्रूकलिन, क्वीन्स व ब्रॉंक्स ह्या चार नगरांना जोडते.
न्यू यॉर्क सिटी सबवे
थोडक्यात पण महत्त्वाचे.