जर्सी सिटी (न्यू जर्सी)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

जर्सी सिटी (न्यू जर्सी)

जर्सी सिटी हे एक हडसन काउंटी, न्यू जर्सी, अमेरिकेमधील महत्त्वाचे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार, जर्सी सिटीची लोकसंख्या २४७,५९७ असून न्यू जर्सीमधील लोकसंख्येच्या आधारे दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.

न्यू यॉर्क शहरी विभागाचा भाग असणारी जर्सी सिटी, पश्चिम मॅनहॅटनच्या बाजूला असून हडसन नदीच्या पलिकडे आहे, तर शहराच्या दुसऱ्या बाजूला हॅकनसॅक नदी आणि नूअर्क बेट आहे. जर्सी सिटी हे शहर मुख्य रेल्वे मार्गांनी जोडलेले असून ११ मैल (१८ किमी)चा किनारा असून एक उत्तम बंदर आहे. जर्सी सिटीमध्ये अनेक उद्योगधंद्यांची भरभराट शहराच्या विकासासाठी कारणीभूत आहे. सुंदर नदीकिनारा असणारे हे अमेरिकेतील एक मोठे डाऊन टाऊन असणारे शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →