कातानिया-फाँतानारोसा विमानतळ (आहसंवि: CTA, आप्रविको: LICC) तथा व्हिन्सेंझो बेलिनी विमानतळ ( इटालियन: Aeroporto Internazionale Vincenzo Bellini di Catania-Fontanarossa ) हा इटलीच्या सिसिली प्रांतातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ कातानिया शहराच्या ४.३ किमी नैऋत्येस आहे.
याला कातानियामथ्ये जन्मलेल्या ऑपेरा संगीतकार विन्सेंझो बेलिनीचे नाव दिलेले आहे.
एस्सॅरोपोर्तीनुसार कातानिया-फाँतानारोसा २०२०मधील सिसिलीतील सर्वाधिक वर्दळीचा तर इटलीतील चौथ्या क्रमांकाचा सर्वात व्यस्त विमानतळ होता. येथून केएलएम, आयटीए एरवेझ, लुफ्तांसा तसेच ईझीजेट आणि रायनएर सह अनेक कंपन्या युरोपमधील रोम, म्युनिक, ॲमस्टरडॅम आणि बर्लिन सह अनेक शहरांना विमानसेवा पुरवता. २०१६मध्ये येथून २० लाख प्रवाशांनी रोम-फियुमिसिनो विमानतळाला ये-जा केली होती.
कातानिया-फाँतानारोसा विमानतळ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?