लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ

जनरल एडवर्ड लॉरेन्स लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ (IATA: BOS, ICAO: KBOS, FAA LID: BOS) अमेरिकेच्या बॉस्टन शहरात आहे. दरवर्षी सुमारे २ कोटी ६० लाख प्रवासी ये-जा करतात. हा अमेरिकेतील सर्वाधिक वर्दळीच्या २० विमानतळांपैकी एक आहे. एरट्रान एरवेझ, अमेरिकन एरलाइन्स, जेटब्ल्यू एरवेझ आणि यु.एस. एरवेझ या विमानकंपन्याची विमाने येथे प्रामुख्याने प्रवाश्यांची ने-आण करतात. येथून अमेरिकेतील बहुतेक मोठ्या शहरांना तसेच मेक्सिको, कॅनडा, कॅरिबियन, युरोप येथे विमानसेवा उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी मोजता लोगन विमानतळ अमेरिकेतील १२वा मोठा विमानतळ आहे. २००५मध्ये येथून ३९,०२,००० आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी आवागमन केले.

लोगन विमानतळ २,३८४ एकरमध्ये पसरलेला असून येथे सहा धावपट्ट्या आहेत व १६,००० कर्मचारी येथे काम करतात. या विमानतळामुळे ७ अब्ज अमेरिकन डॉलरची उलाढाल होते.

हा विमानतळ ईस्ट बॉस्टन आणि विन्थ्रोप या उपनगरांत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →