डीट्रॉइट मेट्रोपॉलिटन वेन काउंटी विमानतळ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

डीट्रॉइट मेट्रोपॉलिटन वेन काउंटी विमानतळ

डेट्रॉईट मेट्रोपॉलिटन वेन काउंटी विमानतळ (इंग्लिश: Detroit Metropolitan Wayne County Airport; IATA: DTW) हा अमेरिकेमधील एक प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ मिशिगन राज्यातील डेट्रॉईट महानगराला विमानसेवा पुरवतो. हा विमानतळ डेट्रॉईट शहराच्या २२ मैल नैऋत्येस स्थित असून तो ४,८५० एकर इतक्या भूभागावर पसरला आहे.

१९३० साली वेन काऊंटी एअरपोर्ट ह्या नावाने खुला करण्यात आलेला हा विमानतळ अमेरिकेमधील सर्वात अद्ययावत व प्रगत विमानतळांपैकी एक मानला जातो. ह्या विमानतळाला ६ धावपट्ट्या व २ टर्मिनल्स आहेत व तो डेल्टा एरलाइन्स दुसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा हब आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →