टल्सा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: TUL, आप्रविको: KTUL, एफ.ए.ए. स्थळसूचक: TUL) हा अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील टल्सा शहरात असलेला विमानतळ आहे. येथे अमेरिकेच्या वायुसेनेचा तळही आहे. हा विमानतळ शहराच्या मध्यवर्ती भागापासून पाच मैल (८ किमी) ईशान्येस आहे. हा विमानतळाच्या नावात आंतरराष्ट्रीय असले तरीही येथून एकही आंतरराष्ट्रीय सेवा उपलब्ध नाही.
ओक्लाहोमा एर नॅशनल गार्डची १३८वी लढाऊ तुकडी येथे ठाण मांडून असते.
टल्सा विमानतळावर अमेरिकन एरलाइन्सचे देखभाल मुख्यालय आहे.
टल्सा आंतरराष्ट्रीय विमानतळ
थोडक्यात पण महत्त्वाचे.