फ्रांकफुर्ट आम माइन आंतरराष्ट्रीय विमानतळ (जर्मन: Flughafen Frankfurt am Main) (आहसंवि: FRA, आप्रविको: EDDF) हा जर्मनी देशामधील सर्वात मोठा व जगातील एक प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ हेसेन राज्यामधील फ्रांकफुर्ट शहरामध्ये स्थित आहे. ८ जुलै १९३६ रोजी बांधून पूर्ण झालेला व २०१२ साली सुमारे ५.७५ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा फ्रांकफुर्ट हा लंडन हीथ्रो व पॅरिस चार्ल्स दि गॉलखालोखाल युरोपामधील तिसऱ्या क्रमांकाच्या तर जगात दहाव्या क्र्मांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फ्रांकफुर्ट विमानतळ
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.