छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई (आहसंवि: BOM, आप्रविको: VABB), शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ पूर्वी सहार विमानतळ म्हणून ओळखला जात असे. सुमारे १८५० एकर परिसरात विस्तारलेला हा विमानतळ भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मुंबई शहरातील अंधेरी या रेल्वे स्टेशनपासून हा सर्वात जवळ आहे . हा विमानतळ भारतातील तसेच दक्षिण आशियातील प्रवासी वाहतुकीच्या संदर्भात, सर्वात व्यस्त विमानतळ आहे.

यामुळे यास भारतीय उपखंडाचे प्रवेशद्वार म्हणले जाते. या विमानतळाला लागूनच देशांतर्गत वाहतुकीचा विमानतळ आहे. त्याचे नावही छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आहे. त्याचे प्रवेशद्वार मुंबईतील विलेपार्ले या रेल्वे स्टेशनजवळ आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →