सहार उन्नत प्रवेश मार्ग (Sahar Elevated Access Road) हा मुंबई शहरामधील एक रस्ता आहे. २.२ किमी लांबीचा हा गतिमार्ग पश्चिम द्रुतगती महामार्गाला छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ सोबत जोडतो.
हा मार्ग बांधण्याआधी मुंबई विमानतळावर पोचण्यासाठी थेट रस्ता नव्हता व विलेपार्ले ते विमानतळ हा रस्ता अरुंद व गर्दीचा झाला होता. केंद्र सरकारने जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत ह्या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला. भारत सरकार, महाराष्ट्र शासन, एम.एम.आर.डी.ए. व मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्या चार संस्थांनी एकत्रितपणे ह्या बांधकामाच्या ₹ ४००.७७ कोटी इतक्या खर्चाचा भार उचलला. १२ फेब्रुवारी २०१४ रोजी मुंबई विमानतळाच्या नव्या टी२ ह्य टर्मिनलासोबतच सहार उन्नत मार्गाचे देखील उद्घाटन करण्यात आले.
ह्या मार्गामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरून विमानतळावर पोचण्यासाठी लागणारा वेळ ३५ ते ४० मिनिटांवरून केवळ ५ मिनिटांवर आला.
सहार उन्नत प्रवेश मार्ग
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?