सर्च इंजिन ऑप्टीमाइझेशन

या विषयातील रहस्ये उलगडा.

सर्च इंजिनमधील सर्च रीझल्ट करताना वेबसाईटची किंवा वेब पेजची दृश्यता परिणामकारक करण्यासाठी सर्च इंजिन ऑप्टिमाइझेशन (एसईओ) केले जाते. सुरुवातीच्या काळात सर्च इंजिन वापरकर्त्यांकडून ज्या संकेतस्थळांना जास्तीत जास्त भेटी दिल्या जात होत्या ती संकेतस्थळे शोधयादीमध्ये झळकताना दिसत होत्या. एसईओ मुळे वेगवेगळया सर्चवर जसे चित्रांसाठी सर्च, स्थानिक बाबींसाठी सर्च, दूरचित्रवाणींसाठी सर्च, महाविदयालयीन / शालेय बाबींकरीता सर्च , उदयोगाशी संबंधित सर्चवर काम करणे शक्य झाले आहे.

सर्च इंजिन कशा प्रकारे काम करते? लोक कशासाठी सर्च करतात ? प्रत्यक्षात सर्च इंजिनमध्ये कोणते प्रतिशब्द दिले जातात? प्रेक्षकाकडून कोणत्या सर्च इंजिनचा वापर केला जातो? या सर्व बाबी एसईओ मध्ये विचारात घेतल्या जातात. मजकूरामध्ये बदल, ठराविक कीवर्डशी संबंधित एचटीएमएल आणि सांकेतांकामध्ये बदल, सर्च इंजिनमधील क्रमांकित प्रणालीमधील अडथळे दूर करणे इ. बाबी वेबसाईट ऑप्टीमाइझेशनमध्ये समाविष्ट आहेत.

एसईओ याचा अर्थ एसईओ सेवा देणारे सर्च इंजिन ऑप्टिमाइझर असा सुद्धा होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →