अँड्रॉईड (इंग्रजी: Android) ही मोबाईल फोनसाठी गूगल कंपनीने विकसित केलेली एक संचालन प्रणाली आहे. ही संचालन प्रणाली लिनक्सवर आधारभूत आहे. गूगलने ही प्रणाली लिनक्सप्रमाणे ठेवण्याचे जाहीर केले आहे. जावा प्रोग्रॅमिंग भाषेसाठी विकासकांना स्वातंत्र्य मिळाले आहे. २१ ऑक्टोबर २००८ला प्रारंभिक आवृत्ती प्रदर्शित करण्यात आली. सध्या ९ डिसेंबर २०१३ रोजी ४.४.२ (जेली बीन) ही आवृत्ती प्रकाशित करण्यात आली आहे. आता मोबाईल पाठोपाठ टॅबलेट पी.सी. साठीही अँड्रॉईड लोकप्रिय होत आहे. वापरकर्त्यांच्या संख्येच्या दृष्टीने आयफोन (आयओएस) खालोखाल दुसरा क्रमांक लागतो. नोकिया, ब्लॅकबेरी ह्या मोठ्या मोबाईल उत्पादक कंपन्या वगळता जगभरातील जवळजवळ सर्व मोठ्या मोबाईल फोन उत्पादकांनी (सॅमसंग, एलजी, सोनी एरिक्सन, मोटोरोला, एचटीसी, डेल, इत्यादी) चालणारे स्मार्टफोन व टॅबलेट पी.सी. तयार केले आहेत.
इ.स. २०१० च्या शेवटी अँड्रॉईड कार्यप्रणाली जगातील सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन प्लॅटफॉर्म बनला आणि त्याद्वारे आधी सुमारे १० वर्षे अधिपत्य गाजवणाऱ्या नोकियाच्या सिंबियन कार्यप्रणालीचे वर्चस्व संपले. कॅनालिस (Canalys) या रिसर्च संस्थेच्या अहवालानुसार इ.स. २०१० च्या शेवटी जगभरातून अँड्रॉईड ३३% स्मार्टफोन विकले गेले तर नोकियाच्या सिंबियनचे ३१% स्मार्टफोन विकले गेले.
अँड्रॉईड मुक्त स्रोत असल्यामुळे अँड्रॉईड विकास करण्यासाठी जगभरात खूप मोठ्या संख्येत विकासकांचा समुदाय आहे. अँड्रॉईड फोनसाठी आतापर्यंत २,००,००० पेक्षा जास्त उपयोजने (ऍप्स) उपलब्ध आहेत. त्यातील बहुसंख्य उपयोजने मोफत आहेत.
अँड्रॉईड
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.