ऑनलाईन जाहिराती म्हणजेच इंटरनेट जाहिराती, ग्राहकांपर्यंत वस्तूंच्या विक्रीकलेबाबतची माहिती पोहोचविण्यासाठी वापरतात. यामध्ये ईमेल विपणन, शोध इंजिन विपणन, सामाजिक मीडिया विपणन अशा वेगवेगळया दर्शनीय जाहिरातींचा समावेश आहे. इतर जाहिरात माध्यामांप्रमाणेच ऑनलाईन जाहिरातीमध्ये सुद्धा प्रकाशक आणि जाहिरातदार एकत्र काम करताना दिसतात. प्रकाशक ऑनलाईन जाहिराती एकत्र करून जाहिरातदाराकडे प्रदर्शित करण्यासाठी देतो. यामध्ये जाहिरात संस्थांचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो. जाहिरात संस्था जाहिरात स्वतः तयार करतात आणि आधुनिक तंत्रज्ञांचा वापर करून त्या जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न स्वतंत्रपणे करतात.
ऑनलाईन जाहिराती हा सध्याचा मोठया प्रमाणावर चालणारा व्यापार आहे आणि दिवसेंदिवस याचा आवाका वाढत आहे. युनायटेड स्टेटस सारख्या ठिकाणी इंटरनेट जाहिरातीद्वारे मिळणारा महसूल दृक - श्राव्य माध्यामातून मिळणा-या महसूलापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे.
ऑनलाइन जाहिराती
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.