पे पर क्लिक

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

वेबसाईटच्या माध्यमातून इंटरनेट जाहिरातीमध्ये पे पर क्लिक (याला प्रत्येक क्लिक मागील किंमत असेही म्हणतात) वापरला जातो. यामध्ये जाहिरातदार प्रकाशकाला किंवा वेबसाईटची मालकी असलेल्या संस्थेला जाहिरातील क्लिक मारल्यानंतर ठराविक रक्कम अदा करतो. यालाच ‘जाहिरातीवर क्लिक मारून दिसण्यासाठी रक्कम खर्ची घालणे’ असही म्हणतात.

सर्च इंजिनचा शोध लागल्यानंतर जाहिरातदार बाजारपेठेमध्ये ठरविलेल्या लक्ष्यानुसार बोली करू लागले. परंतु या पद्धतीपेक्षा प्रत्येक क्लिकमागे ठोक रक्कम आकारण्याची पद्धत सर्वसाधारणपणे वापरली जाते. जाहिरातींमध्ये बॅनर जाहिराती, वेबसाईटवरील किंवा सर्च इंजिनशी संबंधित मजकुरांचा समावेश आहे.

यामध्ये जेव्हा जेव्हा लोक एखाद्या साईटवर सर्फिंग करतात तेव्हा या जाहिरातींमुळे त्यांना हवी असलेली वस्तू खरेदी करण्याची संधी सहजपणे उपलब्ध होत असते.

गूगल सारख्या कंपनीने फसवेगिरी किंवा बनावटगिरी होऊ नये यासाठी आज्ञावली तयार केलेली असली तरी देखील या प्रकारच्या जाहिरातीमध्ये प्रत्येक क्लिकमागे फसवणूक होऊ शकते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →