एखादया विषयासंदर्भात माहिती / मजकूर माध्यमांद्वारे विशेषतः डिजिटल माध्यमाद्वारे माहितीची आवश्यकता असलेल्या व्यक्तीपर्यंत किंवा प्रेक्षकांपर्यंत पाहोचविण्यामध्ये कन्टेन्ट क्रिएशन्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. एखादया माध्यमाद्वारे जसे भाषण, अभिव्यक्ती, लेखन किंवा इतर कला या द्वारे स्वतःला व्यक्त करताना, जाहिरात करताना, मार्केटिंग किंवा प्रसिद्धी करताना तयार होणा-या शब्दसंपत्तीस मजकूर (कन्टेन्ट ) असे म्हणले जाते.. वेबसाईटची देखभाल करणे आणि वेबसाईट अदययावत करणे, ब्लॉगिंक, छायाचित्रण, चित्रीकरण, ऑनलाईन कॉंमेन्ट्री, सोशल मिडीआ अकांऊटची देखभाल करणे, डिजिटल माध्यमामध्ये येणा-या अडचणी दूर करणे किंवा त्यात काही बदल करणे या सर्व बाबी कन्टेन्ट क्रिएशन्समध्ये समाविष्ट आहेत. प्यू अहवालानुसार कन्टेन्ट क्रिएशन्स म्हणजे ‘ऑनलाईन जगतामध्ये लोकांचा सहभाग वाढविणे ’.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कन्टेन्ट क्रिएशन्स
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.