शेर-आय-काश्मीर स्टेडियम

या विषयावर तज्ञ बना.

शेर-आय-काश्मीर स्टेडियम

शेर-ए-काश्मीर मैदान हे भारताच्या श्रीनगर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१३ ऑक्टोबर १९८३ रोजी भारत आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.



जम्मू आणि काश्मीरमधील वाढते दहशतवादी हल्ले आणि राजकीय अस्वस्थता या कारणामुळे भारतीय सैन्याने या स्टेडियमवर तब्बल १८ वर्षे तळ ठोकला होता. सन २००७ मध्ये जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनला पुन्हा हे मैदान देण्यात आले. सन २००२ तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी याच स्टेडियमवर एका सभेला संबोधित केले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →