पिंडी क्लब मैदान

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

पिंडी क्लब मैदान हे पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

२७ मार्च १९६५ रोजी पाकिस्तान आणि न्यू झीलंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आणि एकमेव कसोटी सामना खेळविण्यात आला. तर ४ डिसेंबर १९८५ रोजी या मैदानावरचा पहिला वहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज संघांमध्ये खेळविण्यात आला.

इसवी सन १९९२ मध्ये रावळपिंडीतच नवीन रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम बांधल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी ह्या मैदानाचे महत्त्व कमी झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →