व्हात्स्लाफ हावेल विमानतळ (चेक: Letiště Václava Havla Praha) (आहसंवि: PRG, आप्रविको: LKPR) हा चेक प्रजासत्ताक देशाच्या प्राग शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. प्राग शहराच्या १० किमी पश्चिमेस असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार चेक प्रजासत्ताकमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ असून युरोपियन संघात नव्याने सामील झालेल्या देशांमध्ये तो सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे.
१९३७ साली बांधल्या गेलेल्या ह्या विमानतळाला २०१२ साली चेक प्रजासत्ताकाचा पहिला राष्ट्राध्यक्ष व्हात्स्लाफ हावेल ह्याचे नाव दिले गेले. प्राग विमानतळावर चेक एरलाइन्स ह्या चेक प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा हब आहे.
व्हात्स्लाफ हावेल विमानतळ प्राग
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.