वर्झावा चोपिन विमानतळ (पोलिश: Lotnisko Chopina w Warszawie) (आहसंवि: WAW, आप्रविको: EPWA) हा पोलंड देशाच्या वर्झावा शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. वर्झावा शहराच्या ३७ किमी उत्तरेस असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार पोलंडमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ असून देशाच्या एकूण आंतरराष्ट्रीय वाहतुकीपैकी ४० टक्के प्रवासी वाहतूक येथूनच होते.
१९३४ साली बांधला गेलेला हा विमानतळ दुसऱ्या महायुद्धादरम्यान बव्हंशी नष्ट झाला होता. युद्धानंतर येथे विमानसेवा पुन्हा सुरू झाली. २००१ साली ह्या विमानतळाला विख्यात पोलिश संगीतकार फ्रेदरिक शोपें ह्याचे नाव दिले गेले. वर्झावा चोपिन विमानतळावर एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्स ह्या पोलंडच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा हब आहे.
वर्षावा चोपिन विमानतळ
यामागील विज्ञान आणि इतिहास.