वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२१-२२

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२१-२२

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर - डिसेंबर २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळवली गेली. मूलत: हा दौरा नोव्हेंबर-डिसेंबर २०२२ दरम्यान होणार होता परंतु तेव्हा दोन्ही संघाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ही मालिका एक वर्ष आधी खेळवण्यात आली. कसोटी मालिकेआधी वेस्ट इंडीजने एक चार-दिवसीय सराव सामना खेळला.

पहिल्या कसोटीत वेस्ट इंडीजसमोर चौथ्या दिवशी ३४८ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. चौथ्या दिवसअखेरीस वेस्ट इंडीजने ५२ धावा करत ६ गडी गमावले. पाचव्या दिवशी उपहारानंतर चिवट खेळ करत वेस्ट इंडीजने कसोटी अनिर्णित राखण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना अपयश आले. पाचव्या दिवशीच्या तिसऱ्या सत्रात वेस्ट इंडीजचा संघ १६० धावांवर सर्वबाद झाला. श्रीलंकेने पहिली कसोटी १८७ धावांनी जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेतली. दुसरी कसोटी देखील १६४ धावांनी जिंकत श्रीलंकेने दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →