ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२२

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२२

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने, पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि दोन कसोटी सामने खेळण्यासाठी जून-जुलै २०२२ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गत खेळविली गेली. मार्च २०२२ मध्ये दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाने दौऱ्याची पुष्टी केली. वरिष्ठ संघाबरोबरच ऑस्ट्रेलिया अ क्रिकेट संघाने देखील श्रीलंकेचा दौरा केला.

ऑस्ट्रेलियाने पहिले दोन ट्वेंटी२० सामने जिंकत मालिका जिंकली. श्रीलंकेने तिसऱ्या ट्वेंटी२० सामन्यात कर्णधार दासून शनाकाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ४ गडी राखून विजय प्राप्त केला. ऑस्ट्रेलियाने पहिला वनडे सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. श्रीलंकेने पुढचे तीन वनडे जिंकत १९९२ नंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथमच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियाने पाचवा सामना ४ गडी राखून जिंकला. कसोटी मालिकेतील पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने तिसऱ्याच दिवशी जिंकली. श्रीलंकेने दुसरी कसोटी १ डाव आणि ३९ धावांनी जिंकली आणि कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. दिनेश चंदिमल याने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले वहिले द्विशतक झळकावले तर १२/११७ ही प्रभात जयसुर्याने श्रीलंकेतर्फे पदार्पणात केलेली सर्वोत्कृष्ट आकडेवारी ठरली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →