इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२१-२२

या विषयातील रहस्ये उलगडा.

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२१-२२

इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी २०२२ दरम्यान महिला ॲशेस मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. महिला ॲशेस मालिकेत एक महिला कसोटी सामना, तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळवले गेले. ॲशेस मालिकेचा विजेता गुणपद्धतीने ठरविण्यात आला. मागील महिला ॲशेस मालिका २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाने १२-४ अश्या फरकाने जिंकली होती. ॲशेस मालिकेसोबतच दोन्ही देशांच्या अ संघांनी देखील सहा मर्यादित षटकांचे सामने खेळले.

कोव्हिड-१९च्या विलगीकरण्याच्या नियमांमुळे ॲशेस मालिका २८ जानेवारी ऐवजी २० जानेवारी पासून सुरू झाली. १७ जानेवारी २०२२ रोजी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले ही महिला ॲशेसमध्ये प्रथमच पंच निर्णय पुनरावलोकन प्रणालीचा उपयोग करण्यात येईल. कसोटीत विजय झाल्यास ४ गुण, कसोटी अनिर्णित सुटल्यास २ गुण तर मर्यादित षटकांच्या सामन्यातल्या विजयांसाठी २ गुण अशी गुणांची विभागणी केली गेली. ऑस्ट्रेलिया महिलांनी पहिली ट्वेंटी२० जिंकत मालिकेत आघाडी घेतली. दुसरा ट्वेंटी२० सामना ४.१ षटकांनंतर आलेल्या पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करावा लागला. तसेच तिसरा ट्वेंटी२० सामना देखील पावसामुळे रद्द केला गेला. त्यामुळे तीन सामन्यांची महिला ट्वेंटी२० मालिका ऑस्ट्रेलियाने १-० ने जिंकली तर ॲशेस मालिकेत ४ गुणांसह आघाडी घेतली.

एकमेव महिला कसोटी सामन्यामध्ये शेवटच्या दिवशी इंग्लंड महिलांना २५७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. ७ गडी शिल्ल्क असताना अखेरच्या दहा षटकांमध्ये ४५ धावांची गरज असताना इंग्लंडचे फटाफट गडी बाद व्हायला सुरुवात झाली. शेवटच्या १२ चेंडूंमध्ये १२ धावांची गरज अश्या थरारक झालेल्या महिला कसोटीत इंग्लंडने पराभव टाळला व एकमेव महिला कसोटी अनिर्णित सुटली. इंग्लंडची कर्णधार हेदर नाइट हिने झळकावलेल्या अप्रतिम शतकाच्या जोरावर तिला सामनावीर घोषित करण्यात आले. एकमेव कसोटी अनिर्णित सुटल्याने ऑस्ट्रेलियाने ६ गुणांसह ॲशेसमध्ये आघाडी कायम ठेवली.

पहिला महिला वनडे सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने महिला ॲशेस मालिका राखली. पहिल्या वनडे सामन्यातील विजयामुळे ऑस्ट्रेलियाला महिला ॲशेसमध्ये ८-४ अश्या गुणांनी अजेय बढत मिळाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →