इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान ७२व्या ॲशेस मालिकेंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळवली गेली. ॲशेस मालिकेपूर्वी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया आणि दोन्ही संघांनी काही सराव सामने खेळले. सदर मालिकेला व्होडाफोन ॲशेस मालिका असे ही संबोधले गेले.
२०१७ मध्ये काही अयोग्य घडल्यामुळे १९ नोव्हेंबर २०२१ रोजी, ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदावरून टिम पेन याने तडकाफडकी राजीनामा दिला. २६ नोव्हेंबर रोजी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सला कर्णधारपदाची जवाबदारी दिली आणि स्टीव्ह स्मिथला उपकर्णधार नेमले गेले. पर्थ येथे होणारी पाचवी कसोटी कोव्हिड-१९ संबंधातील नियमांमुळे अन्यत्र स्थानांतरित करण्यात येणार असल्याची घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नोव्हेंबर मध्ये केली. सदर स्थानांतरित केलेली पाचवी कसोटीदेखील ॲडलेड कसोटी प्रमाणेच दिवस/रात्र खेळविण्यात येईल. पाचवी कसोटी होबार्टला खेळविण्यात आली.
ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ४-० अशी जिंकत ॲशेस चषक राखला. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडला प्रतिष्ठित असे कॉम्पटन-मिलर पदक प्रदान करण्यात आले.
२०२१-२२ ॲशेस मालिका
या विषयावर तज्ञ बना.