ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२१-२२

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२१-२२

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल २०२२ तीन कसोटी सामने, तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत खेळविण्यात आली आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली. ऑस्ट्रेलियाने १९९८ नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानचा दौरा केला. ही मालिका पहिलीच अशी मालिका होती जेव्हा दोन्ही संघ बेनॉ-कादिर चषकासाठी खेळले.

नोव्हेंबर २०२१ मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दौऱ्याची पुष्टी केली. ४ फेब्रुवारी २०२२ रोजी पीसीबीने एकदिवसीय सामने आणि ट्वेंटी२० सामना लाहोरहून रावळपिंडीला हलवले. परंतु पुन्हा काही कारणास्तव एकदिवसीय सामने आणि ट्वेंटी२० सामना रावळपिंडीहून लाहोरला हलवले गेले. अखेरीस २७ फेब्रुवारी २०२२ रोजी, २४ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे उतरला. रावळपिंडी येथील पहिला कसोटी सामना अनिर्णित सुटला. पाकिस्तानचा इमाम उल हक हा कसोटीच्या दोन्ही डावामध्ये शतक झळकावणारा पाकिस्तानचा दहावा खेळाडू ठरला. दुसरी कसोटी देखील अनिर्णित सुटली. तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत ११५ धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची कसोटी मालिका १-० ने जिंकली. पाकिस्तानी भूमीवर १९९८ नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका जिंकली. मध्यंतरीच्या काळात ऑस्ट्रेलियाने २००२ साली तटस्थ ठिकाणी पाकिस्तानचा कसोटी मालिकेत पराभूत केले होते. पाकिस्तानने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. एकमेव ट्वेंटी२० सामन्यात पाकिस्तानचा ३ गडी राखून पराभव करीत ऑस्ट्रेलियाने दौऱ्याची विजयी सांगता केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →