पाकिस्तान क्रिकेट संघाने एप्रिल २०२१ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि चार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. एकदिवसीय मालिका ही २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली.
आयसीसीच्या वेळापत्रकानुसार ही मालिका ऑक्टोबर २०२० मध्ये नियोजित होती. परंतु तेव्हा जगात कोरोनाव्हायरस ह्या साथीच्या रोगाच्या संक्रमणामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. ऑक्टोबर २०२० मध्येच दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने हा दौरा एप्रिल २०२१ मध्ये होईल असे संकेत दिले. जानेवारी २०२१ मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दौऱ्याला सहमती दर्शवत दौऱ्याची अधिकृत घोषणा केली. फेब्रुवारी २०२१ मध्ये तीन ऐवजी चार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांसह सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. ४ मार्च २०२१ रोजी क्विंटन डी कॉकला दक्षिण आफ्रिकेच्या मर्यादित षटकांच्या संघाच्या कर्णधारपदावरून दूर केले. त्याच्याजागी टेंबा बवुमाकडे कर्णधारपद सोपविले गेले. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका पाकिस्तानने २-१ ने जिंकली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका देखील पाकिस्तानने ३-१ ने जिंकली.
दक्षिण आफ्रिकेत खेळून झाल्यावर पाकिस्तानी संघ लगेचच दोन कसोटी आणि तीन ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वेस रवाना झाला.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२०-२१
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.