दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२०-२१

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२०-२१

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा याच्याअंतर्गत खेळवली गेली. दक्षिण आफ्रिकेने तब्बल १४ वर्षांनंतर पाकिस्तानचा दौरा केला. याआधी दक्षिण आफ्रिकेने २००७-०८ च्या मोसमात पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यानंतर या दौऱ्यापर्यंत दोन्ही संघ संयुक्त अरब अमिरातीत द्विपक्षीय मालिका खेळायचे.

डिसेंबर २०२० मध्ये क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने संघ पाकिस्तानचा दौरा करणार याची पुष्टी केली. दक्षिण आफ्रिका संघ निवडसमितीने क्विंटन डी कॉकला कसोटी कर्णधार केले तर ट्वेंटी२० मालिकेसाठी हेन्रीच क्लासेनला कर्णधार केले गेले. दौऱ्यातील पहिली कसोटी कराचीमध्ये, दुसरी कसोटी रावळपिंडीत तर तिन्ही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने लाहोर येथे होतील असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जाहीर केले.

पाकिस्तानने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. ऑक्टोबर २००३ नंतर पाकिस्तानने प्रथमच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका जिंकली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिकेत पाकिस्तानने २-१ असा विजय मिळवला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →