दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर २०२१ दरम्यान श्रीलंकेचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली. पूर्वनियोजनाप्रमाणे हा दौरा जून २०२० मध्ये होणार होता. परंतु कोरोनाव्हायरसच्या फैलावामुळे दौरा पुढे ढकलण्यात आला होता, तथापि सप्टेंबर २०२१ मध्ये दौरा होणार असल्याचे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने जाहीर केले. सर्व सामने कोलंबोतील रणसिंगे प्रेमदासा मैदानावर खेळविण्यात आले.
श्रीलंकेने पहिला एकदिवसीय सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन करत पावसाचा व्यत्यय आलेला सामना ६७ धावांनी जिंकत मालिका एक सामना शेष असताना १-१ अश्या बरोबरीच्या स्थितीत आणून ठेवली. दक्षिण आफ्रिकेचा नियमीत कर्णधार टेंबा बवुमाला पहिल्या सामन्यात दुखापत झाल्याने उर्वरीत दोन एकदिवसीय सामन्यांसाठी केशव महाराज याने दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले. श्रीलंकेने तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ७८ धावांनी विजय मिळवत एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. एकदिवसीय मालिकेत पराभव पत्करावा लागल्यानंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका ३-० ने जिंकून दक्षिण आफ्रिकेने दौऱ्याचा विजयाने समारोप केला.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२१-२२
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.