पाकिस्तान क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जुलै २०२१ दरम्यान इंग्लंडचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली.
सुरुवातीस आयॉन मॉर्गनला पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडच्या कर्णधारपदी नेमण्यात आले होते परंतु इंग्लंडचे काही खेळाडू आणि संघ व्यवस्थापनेमधील काही कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्याने मालिकेसाठी निवडलेला संपूर्ण संघ विलगीकरणात ठेवायला लागला. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने उपकर्णधार बेन स्टोक्सच्या नेतृत्वात १५ जणांचा दुसरा संघ जाहीर केला. इंग्लंड बोर्डाने कोव्हिड संदर्भात घेतलेली काळजी यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने समाधान दर्शवले.
इंग्लंडने पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकत मालिकाविजय निश्चित केला. तिसऱ्या सामन्यात देखील पाकिस्तानला ३ गडी राखून पराभव करत इंग्लंडने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ३-० अश्या फरकाने जिंकली. पाकिस्तानने ट्वेंटी२० मालिकेत बलाढ्य धावसंख्या उभारून इंग्लंडवर मात करत मालिकेत आघाडी घेतली. पहिल्या ट्वेंटी२० सामन्यात उभारलेली २३२ ही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मधील पाकिस्तानची सर्वोच्च धावसंख्या आहे. इंग्लंडने दुसरी ट्वेंटी२० ४५ धावांनी जिंकत मालिका १-१ अशी बरोबरीच्या स्थितीत आणून ठेवली. तिसऱ्या आणि अखेरच्या निर्णायक ट्वेंटी२० सामन्यात इंग्लंडने विजय मिळवत तीन सामन्यांची ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२१
यामागील विज्ञान आणि इतिहास.