ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जुलै २०२१ दरम्यान वेस्ट इंडीजचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली. बहुतांशी खेळाडूंचे कोव्हिड लसीकरण झाल्यावर ऑस्ट्रेलियन संघ २८ जून २०२१ रोजी वेस्ट इंडीज मध्ये दौऱ्यासाठी दाखल झाला.

वेस्ट इंडीजने ट्वेंटी२० मालिकेतील पहिले तीन सामने जिंकत मालिका विजय निश्चित केला. तिसऱ्या ट्वेंटी२० सामन्यादरम्यान वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलने ट्वेंटी२० क्रिकेट प्रकारामध्ये (आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० आणि फ्रॅंचायझी तसेच आयसीसी मान्यताप्राप्त घरेलु ट्वेंटी२० सामने) १४,००० धावांचा टप्पा पार केला. असे करणारा गेल जगातला पहिला खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियाने चौथा सामना जिंकत ट्वेंटी२० प्रकारात वेस्ट इंडीजवर २०१२ नंतर प्रथमच विजय मिळवला. वेस्ट इंडीजचे पाचवा आणि अखेरचा ट्वेंटी२० सामना जिंकत पाच सामन्यांची ट्वेंटी२० मालिका ४-१ ने जिंकली.

एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना पावसाचा व्यत्यत आला तरी ऑस्ट्रेलियाने १३३ धावांनीउ जिंकला. २२ जुलै २०२१ रोजी होणारा दुसरा एकदिवसीय सामना अकस्मातपणे स्थगित करण्यात आला. वेस्ट इंडीजच्या गोटातील एका कर्मचाऱ्या कोरोनाव्हायरस झाल्याचे नाणेफेक झाल्यावर निर्दशनास आले. त्यामुळे सामना पुढील सूचना येईस्तोवर थांबविण्यात आला. सर्व खेळाडू, सामनाधिकारी यांना तात्काळ हॉटेलमध्ये पाठवून विलगीकरणात ठेवण्यात आले. दुसरा सामना पुर्नियोजीत करत २४ जुलै रोजी खेळवण्यात आला तर तिसरा सामना २६ जुलै रोजी खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →