भारत क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०२० - जानेवारी २०२१ दरम्यान ४ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका ही २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळवली गेली तर वनडे मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगअंतर्गत खेळवली गेली. भारतीय क्रिकेट मार्च २०२० मध्ये कोरोना व्हायरसमुळे बंद पडल्यानंतरची ही भारताची पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे. ॲडलेड येथील पहिली कसोटी ही दिवस/रात्र कसोटी आहे.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ ने जिंकली. ट्वेंटी२० मालिका भारताने २-१ ने जिंकली. कसोटी मालिका २-१ अशी जिंकत भारताने बॉर्डर-गावसकर चषक राखला.
भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२०-२१
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.