भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२१-२२

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२१-२२

भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने एकमेव महिला कसोटी सामना, तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (महिला वनडे) आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्ध २००६ नंतर प्रथमच महिला कसोटी सामना खेळला. एकमेव महिला कसोटी ही भारताची पहिली दिवस/रात्र कसोटी होती.

नियोजनाप्रमाणे ही मालिका जानेवारी २०२१ मध्ये होणार होती परंतु कोरोनाव्हायरसमुळे मालिका पुढे ढकलण्यात आली. शेवटी मालिका सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाणार असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केले. २० मे २०२१ रोजी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वेळापत्रक जारी केले. संपूर्ण दौरा हा गुण पद्धतीने खेळविला गेला. कसोटीत विजय झाल्यास ४ गुण, कसोटी अनिर्णित सुटल्यास २ गुण तर मर्यादित षटकांच्या सामन्यातल्या विजयांसाठी २ गुण अशी गुणांची विभागणी केली गेली.

ऑस्ट्रेलियाने पहिला एकदिवसीय सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने सलग २५वा एकदिवसीय सामना जिंकत त्यांचा विजयरथ अभेद्य ठेवला. शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना या स्थितीत पोचलेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने थरारक विजय मिळवत मालिका विजय नोंदवला. भारताने तिसरा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, ऑस्ट्रेलियाने महिला एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. एकमेव महिला कसोटी सामना अनिर्णित सुटला. भारताच्या स्म्रिती मंधानाने शानदार शतक झळकावत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. ट्वेंटी२० मालिकेतील पहिला सामन १५ षटकांनंतर पावसामुळे रद्द करण्यात आला. उर्वरीत दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकत मालिकेत २-० ने विजय मिळवला. गुण पद्धतीवर खेळवली गेलेली मालिका ऑस्ट्रेलियाने ११-५ अश्या फरकाने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →