बांगलादेश क्रिकेट संघाने एप्रिल - मे २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळवली गेली. वेळेपत्रकानुसार ही मालिका ऑगस्ट २०२० होणार होती. परंतु कोरोनाव्हायरसच्या फैलावामुळे मालिका पुढे ढकलण्यात आली.
नियोजनानुसार दौऱ्यात एकूण तीन कसोटी सामने खेलविळे जाणार होते, परंतु १९ मार्च २०२१ रोजी वेळापत्रक जाहीर करताना श्रीलंका बोर्डाने एक कसोटी कमी करत दोन कसोटींसह सामन्याचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. पहिली कसोटी अनिर्णित राहिली तर दुसरी कसोटी २०९ धावांनी जिंकत श्रीलंकेने कसोटी मालिका १-० ने जिंकली.
बांगलादेश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२०-२१
यामागील विज्ञान आणि इतिहास.