बांगलादेश क्रिकेट संघाने जानेवारी २०२२ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा याच्याअंतर्गत खेळवली गेली. कसोटी सामन्यांआधी बांगलादेश संघाने एक सराव सामना खेळला. मूलत: वेळापत्रकात तीन ट्वेंटी२० सामन्यांचाही समावेश होता. परंतु नोव्हेंबर २०२१ मध्ये न्यू झीलंड बोर्डाने ट्वेंटी२० सामने वगळून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले.
बांगलादेशने पहिला कसोटी सामना जिंकत इतिहास रचला. न्यू झीलंडविरुद्ध बांगलादेशने प्रथमच कसोटी विजय प्राप्त केला होता. परंतु हा विजयरथ बांगलादेशला चालु ठेवता आला नाही. दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करत न्यू झीलंडने मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. या मालिकेनंतर न्यू झीलंडचा खेळाडू रॉस टेलर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला.
बांगलादेश क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२१-२२
यामागील विज्ञान आणि इतिहास.