नेदरलँड्स क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल २०२२ दरम्यान एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली. मूलत: सदर मालिका जानेवारी २०२२ मध्ये होणार होती परंतु कोव्हिड-१९मुळे मालिका २ महिने पुढे ढकलण्यात आली व सामन्यांच्या ठिकाणांमध्ये काही बदल करण्यात आले. न्यू झीलंड आणि नेदरलँड्समधील ही पहिलीच द्विपक्षीय मालिका होती.
एकमेव आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना पावसामुळे रद्द करावा लागला. न्यू झीलंडने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली. तिसरा वनडे सामना हा न्यू झीलंडच्या रॉस टेलरचा अखेरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होता. रॉस टेलर न्यू झीलंडसाठी एकूण ४५० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळून निवृत्त झाला.
नेदरलँड्स क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२१-२२
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?