ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर २०२० मध्ये इंग्लंडचा दौरा केला. दौऱ्यातील एकदिवसीय सामने हे २०२३ क्रिकेट विश्वचषकाच्या कसोटी देशांच्या पात्रतेच्या २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आले.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिकेत इंग्लंडने २-१ असा विजय मिळवला. तर ऑस्ट्रेलियाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२०
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!