बांगलादेश क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२१

या विषयातील रहस्ये उलगडा.

बांगलादेश क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२१

बांगलादेश क्रिकेट संघाने एकमेव कसोटी सामना, तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जुलै २०२१ दरम्यान झिम्बाब्वेचा दौरा केला. बांगलादेशने २०१३ नंतर प्रथमच झिम्बाब्वेचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. नियोजनानुसार एकूण दोन कसोटी सामने खेळविले जाणार होते. परंतु ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होऊ घातलेल्या २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक साठी सराव व्हावा यासाठी दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांनी संमतीने एक कसोटी सामना कमी केला आणि त्याजागी दोन ऐवजी तीन ट्वेंटी२० सामने जाहीर केले. सर्व सामने हरारे मधील हरारे स्पोर्ट्स क्लब या मैदानावर खेळवले गेले.

एकमेव कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू महमुद्दुला याने सदर कसोटी सामना संपताच कसोटी क्रिकेट मधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. बांगलादेशने एकमेव कसोटी सामना २२० धावांनी जिंकला. बांगलादेशने पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकत एक सामना शेष असताना मालिकेत अभेद्य आघाडी मिळवली. तिसरा सामना देखील बांगलादेश ने जिंकत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली.

१९ जुलै २०२१ रोजी दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांच्या संमतीने ट्वेंटी२० मालिकेचे वेळापत्रक बदलण्यात आले. सुधारित वेळापत्रकानुसार तीन ट्वेंटी२० सामने अनुक्रमे २२, २३ आणि २५ जुलै २०२१ रोजी आयोजीत केले गेले. पहिला ट्वेंटी२० सामना बांगलादेशने जिंकला आणि अनोखा विक्रम रचला. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान या संघांनंतर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील संघाचे १००वे सामने जिंकणारा बांगलादेश तिसरा देश ठरला. बांगलादेशने ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →