अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२२

थोडक्यात पण महत्त्वाचे.

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२२

अफगाणिस्तान क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जून २०२२ मध्ये झिम्बाब्वेचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. सर्व सामने हरारे शहरातील हरारे स्पोर्ट्स क्लब या मैदानावर झाले. मूलत: वेळापत्रकामध्ये पाच ट्वेंटी२० सामन्यांचा समावेश होता परंतु नंतर दोन ट्वेंटी२० सामने वगळण्यात आले.

सदर मालिका ऑगस्ट २०२० मध्ये अपेक्षित होती. परंतु कोव्हिड-१९ मुळे मालिका पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये मालिका खेळविण्यात येईल असा संभाव्य अंदाज होता. परंतु झिम्बाब्वेतर्फे दूरवित्रवाणीवर प्रक्षेपणासाठी लागणारे आवश्यक हक्क व परवानगी न मिळाल्याने पुन्हा एकदा मालिका पुढे ढकलण्यात आली. सरतेशेवटी मालिका जून २०२२ मध्ये होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. एकदिवसीय मालिकेआधी अफगाणिस्तानने एक सराव सामना देखील खेळला. अफगाणिस्तानने एकदिवसीय मालिकेत ३-० ने विजय प्राप्त केला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका देखील अफगाणिस्तानने ३-० ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →