पाकिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२१-२२

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२१-२२

पाकिस्तान क्रिकेट संघाने नोव्हेंबर - डिसेंबर २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळवली गेली. सप्टेंबर २०२१ मध्ये बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दौऱ्याचे वेळापत्रक जारी केले. पाकिस्तानने एप्रिल-मे २०१५ नंतर प्रथमच बांगलादेशचा दौरा केला.

तिन्ही सामने जिंकत पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिकेत ३-० अश्या फरकाने विजय मिळवला. तसेच दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानने विजय मिळवत कसोटी मालिका २-० ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →