श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२२

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२२

श्रीलंका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने मे-जून २०२२ दरम्यान तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गत खेळवली गेली. सर्व सामने कराची मधील साऊथएण्ड क्लब क्रिकेट स्टेडियम या मैदानावर खेळविण्यात आले. पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेचे सामने खेळविण्यात आले.

तीनही ट्वेंटी२० सामन्यांमध्ये विजय मिळवत पाकिस्तानी महिलांनी ट्वेंटी२० मालिका ३-० ने जिंकली. पाकिस्तानने पहिले दोन वनडे सामने जिंकत मालिका जिंकली. श्रीलंकेने शेवटच्या सामन्यात विजय मिळवला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →