भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून-जुलै २०२२ दरम्यान तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गत खेळवली गेली. मिताली राज हिने घेतलेल्या निवृत्तीमुळे हरमनप्रीत कौरला भारताच्या कर्णधारपदी नेमण्यात आले.
भारताने पहिला ट्वेंटी२० सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. दुसरा सामन्यात देखील विजय मिळवत भारताने श्रीलंकेविरुद्ध सलग बारावा ट्वेंटी२० विजय नोंदवला. तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात कर्णधार चामरी अटापट्टूच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेने भारताचा ७ गडी राखून पराभव केला, हा श्रीलंकेचा मायदेशातील भारताविरुद्धचा पहिला ट्वेंटी२० विजय होता. भारतीय महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली.
भारताने पहिला महिला वनडे सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यात भारताने १७४ धावांचे लक्ष्य एकही गडी बाद न होता पार केले. महिला वनडे सामन्यांमध्ये एकही गडी बाद न होता पाठलाग केलेली ही सर्वोच्च धावसंख्या होती. तिसऱ्याही सामन्यामध्ये विजय मिळवत भारताने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली.
भारतीय महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२२
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.