इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१-२२

थोडक्यात पण महत्त्वाचे.

इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१-२२

इंग्लंड क्रिकेट संघाने प्रथम २२ जानेवारी ते ३० जानेवारी २०२२ दरम्यान पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी आणि त्यानंतर पुन्हा काही कालांतराने ८ ते २८ मार्च २०२२ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळविण्यात आली. तसेच या मालिकेपासून वेस्ट इंडीज आणि इंग्लंडमधील इथून पुढील सर्व कसोटी मालिकांना रिचर्ड्स-बॉथम चषक या नावाने खेळवायला सुरुवात झाली. ऑक्टोबर २०२१ मध्ये वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने दौऱ्याची अधिकृत घोषणा केली.

ट्वेंटी२० मालिकेपुर्वी इंग्लंडने बार्बाडोस क्रिकेट बोर्ड अध्यक्षीय एकादश या संघाविरुद्ध एक २० षटकांचा सराव सामना खेळला. वेस्ट इंडीजने पहिला ट्वेंटी२० सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली. इंग्लंडने दुसरा सामना जिंकत मालिका १-१ बरोबरीत आणली. तिसऱ्या सामन्यात रोव्हमन पॉवेलने केलेल्या शतकाच्या जोरावर वेस्ट इंडीजने मिळवला व मालिकेत पुन्हा आघाडी घेतली. इंग्लंडने चौथा सामना जिंकत मालिका पुन्हा २-२ अशी बरोबरीच्या स्थितीत आणून ठेवली. पाचव्या व अखेरच्या ट्वेंटी२० सामन्यात जेसन होल्डर याच्या ५ गड्यांच्या जोरावर वेस्ट इंडीजने इंग्लंडचा १७ धावांनी पराभव केला व आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका ३-२ ने जिंकली. पहिला कसोटी सामना अनिर्णित सुटला. दुसरा कसोटी सामना पण अनिर्णित सुटला. तिसऱ्या कसोटीत वेस्ट इंडीजने इंग्लंडचा १० गडी राखून पराभव करत कसोटी मालिका १-० ने जिंकली. वेस्ट इंडीज उद्घाटनाच्या रिचर्ड्स-बॉथम चषकाचा विजेता ठरला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →