वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जानेवारी २०२५ मध्ये दोन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. ही मालिका २०२३-२०२५ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग बनली. जुलै २०२४ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) ने २०२४-२५ घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून, दौऱ्यासाठीचे सामने निश्चित केले.
सुरुवातीला ही मालिका १६ जानेवारी (कराची येथे पहिली कसोटी) आणि २४ जानेवारी (दुसरी कसोटी) रोजी होणार होती. डिसेंबर २०२४ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पहिली कसोटी कराचीतून मुलतान येथे हलवून मालिका पुन्हा शेड्यूल केली.
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२४-२५
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.