विष्णू सूर्या वाघ (२४ जुलै १९५४; तिसवाडी, गोवा, भारत, - ८ फेब्रुवारी २०१९; केपटाऊन, दक्षिण आफ्रिका) हे गोव्यातील कवी, नाटककार होते, आणि २०१२ ते २०१७ या काळात ते गोवा विधानसभेचे आमदार व नंतर उपसभापती होते.
साहित्य क्षेत्रासह संगीत, नाट्य, चित्र, व्यंगचित्र, शिल्प, वक्ता आदी कलांमध्ये प्रभुत्व असणारे विष्णू वाघ हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. मराठी राजभाषा व्हावी, यासाठी केलेल्या अनेक आंदोलनांत ते सतत अग्रभागी होते. त्यांचे अनेक कवितासंग्रह, नाटके, एकांकिका गोव्यासह देशभर गाजल्या. साहित्यिक म्हणून सिद्धहस्त असतानाच राजकीय क्षेत्रातही त्यांनी विशेष ठसा उमटवला होता. साहित्य असो वा राजकारण, त्यांनी नेहमीच अन्यायाविरोधात प्रखर लढा दिला. शोषितांचे कैवारी अशीही प्रसिद्धी त्यांना लाभली होती.
विष्णु वाघ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.