सलील वाघ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

सलील वाघ (१९६७:राजकोट - ) हे एक मराठी कवी आहेत.

त्यांचे, निवडक कविता, रेसकोर्स आणि इतर कविता, टाळलेल्या कविता इत्यादी सात कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. रेसकोर्स आणि इतर कविता ह्या पुस्तकाचा लक्षणीय ठसा समकालीन कवितेवर व समीक्षेत उमटला. हिंदी कवी शमशेर बहादुर सिंह यांच्या कवितांवरचा त्यांचा दीर्घ लेखही प्रकाशित झाला आहे. रॅडिकल ह्युमनिस्ट असोसिएशनचे ते सक्रीय सदस्य होते. 'मराठी अभ्यास परिषद' ह्या संशोधन-संस्थेचे ते कार्यकारीमंडळ सदस्य आणि मार्च २०२४ पर्यंत अध्यक्ष होते. सन २०२३ पासून प्राज्ञपाठशाळामंडळाच्या 'नवभारत' मासिकाचे ते एक विद्यमान संपादक आहेत. प्राज्ञपाठशाळामंडळाचे ते एक संचालक आहेत. तळटीप ह्या भाषाभ्यासविषयक नियतकालिकाचेही ते संपादक आहेत. सन २००६ सालचा पहिला शब्दवेध सन्मान आणि २०१७ सालचा साहिर लुधियानवी सन्मान असे सन्मान त्यांना मिळालेले असून त्यांच्या कविता साहित्य अकादमीसह अनेक महत्वाच्या संकलनांमधून समाविष्ट झालेल्या आहेत. अभिधानंतर, खेळ, नवाक्षरदर्शन, अनुष्ठुभ इत्यादी नियतकालिकांसह लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स आदी वर्तमानपत्रातूनही त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे. स्प्रिंगर व्हरलॅग प्रकाशन संस्थेत त्यांना काही काळ विभागप्रमूख म्हणून काम केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →