विनायक मेटे

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

विनायक मेटे

विनायक तुकाराम मेटे (३० जून १९६३ - १४ ऑगस्ट २०२२) हे एक भारतीय राजकारणी आणि शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते. ते मराठा आरक्षण आंदोलनातील महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. मेटे हे अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे अध्यक्ष देखील होते.

३ जून २०१६ रोजी त्यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली होती. ते सर्वप्रथम शिवसेना - भाजप युती सरकारच्या काळात आमदार झाले. त्यानंतर सलग पाच वेळा ते विधानपरिषद सदस्य झाले.

२०१४ पर्यंत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत बीड विधानसभा मतदारसंघामधून ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.

१४ ऑगस्ट २०२२ रोजी गाडीच्या अपघातात मेटे यांचे निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →