लिंक लाइट रेल

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

लिंक लाइट रेल ही अमेरिकेच्या सिअ‍ॅटल शहर आणि परिसरातील रेल्वे वाहतूक आहे. ही जलद परिवहन सेवा तीन वेगवेगळ्या भागांत आहे. यांतील किंग काउंटीमधील १ लाइन (पूर्वीची सेंट्रल लिंक) हा २६ मैल (४२ किमी) लांबीचा मार्ग सिअ‍ॅटल आणि सिएटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडतो. २ लाइन हा किंग काउंटीच्या पूर्व भागातील मार्ग बेलव्ह्यू आणि रेडमंड यांच्या मध्ये आहे तर टी लाइन (पूर्वीचा टॅकोमा लिंक मार्ग) हा ४ मैल (६.४ किमी) लांबीचा मार्ग पीयर्स काउंटीमध्ये टॅकोमा शहराच्या मध्यवर्ती भागापासून साउंडर रेल्वे मार्गावरील टॅकोमा डोम स्थानका दरम्यान धावतो. २०२३मध्ये लिंक लाइट रेलवर २ कोटी ३९ लोक प्रवाशांनी प्रवास केला होता. यातील बहुसंख्य प्रवासी १ लाइन वर होते. लिंक लाइट रेल वरील गाड्या दर ६ ते २४ मिनिटांनी धावतात.

२ लाइनचा पहिला टप्पा २७ एप्रिल, २०२४ रोजी साउथ बेलेव्ह्यू आणि रेडमंड टेक्नॉलॉजी स्थानकां दरम्यान सुरू झाला२०२५ पर्यंत हा मार्ग सिअ‍ॅटल आणि पूर्वेला रेडमंडच्या मध्यवर्ती भागापर्यंत विस्तारित केला जाईल. २०४४ पर्यंतच्या आराखड्यानुसार साउंड ट्रान्झिट लिंक लाइट रेल प्रणाली ११६ मैल (१८७ किमी) ची असेल आणि त्यावर ७० स्थानके असतील.Map

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →