लखीमी बरुआ ह्या एक भारतीय बँकर , सामाजिक कार्यकर्त्या आणि आसामच्या पहिल्या महिला सहकारी बँक 'कोनोकलता (मराठी:कनक-लता) महिला नागरी सहकारी बँकेच्या' संस्थापक आहेत. ही सहकारी बँक विशेष करून महिला ग्राहकांसाठी असून या बँकेच्या सर्व कर्मचारी सुद्धा महिला आहेत. आसामच्या महिलांना आर्थिक सशक्तीकरणाच्या योगदानासाठी आणि त्याकरिता घेतलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना भारत सरकारने इ.स. २०२१ मध्ये पद्मश्री पुरस्कार (भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार) देऊन सन्मानित केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लखीमी बरुआ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.