नारी शक्ती पुरस्कार

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

नारी शक्ती पुरस्कार

नारी शक्ती पुरस्कार हा एक भारत सरकार तर्फे दिला जाणारा, महिलांसाठींचा सर्वोच्च पुरस्कार आहे. असामान्य कर्तृत्त्व दाखवणाऱ्या व्यक्तिगत महिलेस किंवा संस्थेस दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार महिला आणि बाल विकास मंत्रालय, भारत सरकार तर्फे सहा विविध वर्गवारीत दिला जातो.

कठिन परिस्थितित एखादी महिला आपली हिम्मत आणि अंतस्थ शक्ती नुसार जे अतुल्य कार्य करते, त्याचा हा सन्मान असून याद्वारे महिला सशक्तीकरण आणि नारीशक्तीचा आदर समाजात वाढवणे हा उद्देश असून

अंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणजे ८ मार्च रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येते यात पुरस्कार विजेत्या महिलेस किंवा संस्थेस एक लाख रुपये आणि एक प्रमाण पत्र दिल्या जाते. या पुरस्काराची सुरुवात 'स्त्री शक्ती पुरस्कार' नावाने इ.स.१९९९ मध्ये झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →